महाराष्ट्र २४- ऑनलाईन – जळगाव – विशेष प्रतिनिधी – गणेश भड – जळगाव जिल्ह्यात १३ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यातील १२ रुग्ण हे भडगाव येथील सापडले. ४ टप्प्यात भडगाव येथे एकाच दिवशी मोठ्या संख्याने रुग्ण सापडल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. भडगाव येथे आज पर्यत १९ रुग्ण झाले आहेत .
भडगाव, जळगाव, चोपडा, भुसावळ, अमळनेर, धरणगाव, जामनेर येथील स्वॅब घेतलेल्या ४८ कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ३५ तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १३ तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भडगावचे बारा तर भुसावळ येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या २७९ झाली आहे.