Horoscope Today दि . ३० जानेवारी ; आज या राशीच्या व्यक्तींना आज व्यवहारात लाभ ; पहा बारा राशींचं भविष्य.

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३० जानेवारी ।

मेष:-
आज शेअर्सच्या व्यवहारातून लाभ संभवतो. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. स्वत:च्या इच्छा स्वत:च पूर्ण कराल. नवीन मित्र जोडाल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल.

वृषभ:-
आज उत्तम व्यावसायिक लाभ होईल. बँकेची कामे सुरळीत पार पडतील. कामात वडिलांची मदत होईल. आर्थिक कामात अधिक वेळ जाईल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.

मिथुन:-
आज वडीलधार्‍यांचा योग्य मान राखाल. दूरच्या प्रवासाचा योग येईल. हातातील कामात यश येईल. तुमच्यातील सज्जनपणा दिसून येईल. जवळचे नातेवाईक भेटतील.

कर्क:-
आज आरोग्याची काळजी घ्यावी. थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. जोडीदाराच्या शांत स्वभावाचे कौतुक कराल. मुलांच्या आनंदात रमून जाल.

सिंह:-
आज घरातील कामात व्यग्र राहाल. मुलांचा धीटपणा वाढेल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. वारसा हक्काच्या कामातून लाभ संभवतो. कौटुंबिक वातावरण समाधानाचे असेल.

कन्या:-
आज जवळचा प्रवास हसत-खेळत होईल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी जाणवतील. कौटुंबिक समस्या हिंमतीने सोडवाल. एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका.

तुळ:-
आज आवडते पदार्थ खायला मिळतील. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. प्रवासात काही अडचणी जाणवतील. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते. उगाच चिडचिड करू नका.

वृश्चिक:-
आज आवडीच्या कामांमध्ये व्यग्र राहाल. कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते. खर्चाला वाटा फुटतील. बोलताना भान राखावे. वस्तूंची आवश्यकता लक्षात घेऊन खर्च करावा.

धनू:-
आज कामातील उत्साह वाढेल. उतावीळपणे निर्णय घेऊ नका. पारंपरिक कामात लक्ष घालावे लागेल. नवीन संधींसाठी काही वेळ द्यावा लागेल. मध्यस्थी कामात फायदा संभवतो.

मकर:-
आज गोष्टींची अनुकूलता समजून घ्यावी. निराशेला बळी पडू नका. जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे. कामात स्त्री वर्गाचा हातभार लाभेल. धार्मिक कामांत अधिकार वाणीने वावराल.

कुंभ:-
आज श्रम अधिक वाढू शकतात. बौद्धिक थकवा जाणवू शकतो. अति विचार करणे टाळावे. व्यावसायिक ठिकाणी अनुकूलता लाभेल. सर्वांशी गोड बोलाल.

मीन:-
आज इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. परोपकाराची जाणीव ठेवाल. कामातील बदलांची कुणकुण लागेल. आवडते छंद जोपासावेत. मदतीचा हात पुढे कराल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *