महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३१ जानेवारी । शेंगाची चटणी, कडक भाकरी हे पदार्थ म्हंटले की सोलापूरची हमखास आठवण होते. त्याचबरोबर सोलापूर शिकमुळे देखील प्रसिद्ध आहे.
# मटण भाजण्याच्या खास पद्धतीला शीक असं म्हंटलं जातं. सोलापुरात येणारे पाहुणे सोलापुरी चादर घ्यायला आणि शीक मटण खायला कधी विसरत नाहीत.
# शिकसाठी लागणारे मटण किंवा चिकन हे सुद्धा स्पेशल प्रकारात तोडावे लागते. प्रत्येक पीसच्या पृष्ठभागी छोटे-मोठे कट्स घ्यावे लागतात.अगदी स्वच्छ पाण्याने ते मटण प्रथम धुवून घ्यावे.
# गरम मसाल्यांसोबत हे लावलेले मिश्रण दोन ते अडीच तास मॅरीनेट करून घ्यावेत. त्यानंतर एका लोखंडी सळईला व्यवस्थितपणे एका मागून एक असे पिसेस लावून घ्यावेत.
# कोळशाच्या आरावर ते मटण भाजत असताना कोळशातून येणारी आग आणि मटणामध्ये असणारे मसाले हे व्यवस्थित भाजले जातील याची काळजी घ्यावी.
# त्यानंतर गॅसवर एका पातेल्यात लोणी टाकून हे कोळशाच्या आरावरून भाजून काढलेले पीस आणि लोणी एकजीव करून घ्यावे.