आजपासून पुण्यातल्या गुलटेकडी मार्केटमधील भुसार विभागही बंद, कोरोनाच्या उद्रेकामुळे निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – मंगळवारपासून भुसारविभागही बंद ठेवण्याचा निर्णय पुणे मर्चंट चेंबर्सने घेतला होता. खरेदीदारांनी भीतीपोटी मार्केटमध्ये गर्दी करू नये असं आवाहन मार्केट कमिटी प्रशासक बी. जी देशमुख यांनी केलं आहे.कोरोनाचा उद्रेक पुण्यात मोठ्या प्रमाणावर झाला आहे. काही व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता पुणे गुलटेकडी मार्केटमधील भुसार विभागही बंद होणार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारपासून हे मार्केट काही दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे पुण्याच्या पूर्ण बाजारपेठेवरच त्याचा परिणाम होणार आहे. काही व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

भाजी मार्केटचे सध्या फक्त उपबाजार सुरू आहेत. पुणे गुलटेकडी मार्केटयार्ड रेड झोनमध्ये असल्याने तेही सध्या बंद आहेत. लोक गर्दी करत नियमांचं पालन करत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मार्केट पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासनही प्रशासक देशमुख यांनी दिलंय.

दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात दररोज कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. अशा रूग्णांना विविध सेवा पुरविण्यासाठी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आयटीआय विभागाने रिमोट कंट्रोलवर आधारित एका रोबोची निर्मिती केली आहे. इतकंच नाही तर ऑटोमटिक सॅनिटायजर वेंडिग मशीन आणि ऑटो कोरोना लक्षणांची चाचणी करणारा रोबोदेखील तयार केला आहे.

कोरोनाची प्राथमिक तपासणी करण्यासाठी एक विशिष्ट चालता बोलता रोबोच पुणे कॅन्टॉनमेंटच्या आयटीआयने विकसित केला आहे. यामुळे कोरोनाचे प्राथमिक निदान होण्यास मदत होणार आहे. हा चालता बोलता रोबोट नागरिकांचे स्क्रींनिग अगर तपासणीच करून थांबणार आहे, असे नाही. तर तो नागरिकांना आरोग्याबाबतचे विविध प्रश्न देखील विचारणार आहे. त्यासाठी खास वेगळी यंत्रणा या रोबोमध्ये विकसित करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *