चिंचवडमध्ये मविआचा उमेदवार ठरेना ; इच्छुक गॅसवर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ६ फेब्रुवारी । पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आजचा दिवस निर्णयक आणि महत्त्वाचा आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ एक दिवस शिल्लक राहिला आहे. पण अजूनही महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार गॅसवर आहे. अजूनही उमेदवार जाहीर करण्यात आले नाही.

भाजपचे दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे कसबा आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपकडून कसब्यात हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. तर चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला तिकीट दिले आहे. पण, महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवार जाहीर झाले नाही.

भाजपने मात्र प्रचारात आघाडी घेतली आहे. मोरया गोसावीचं दर्शन घेऊन नेत्यांची भेट घेत अश्विनी जगताप यांची प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत थोड्याच वेळात अश्विनी जगताप उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

तर, महविकास आघाडीतील चिंचवड विधानसभा कोण लढवणार यावर अजून एकमत झाले नाही. ठाकरे गटाचे राहुल कलाटे आणि राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्या मोरेश्वर भोंडवे आणि नाना काटे यांच्यामध्ये उमेदवारी घेण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. उमेदवारी जाहीर होत नसल्याने महाविकास आघाडीमध्ये शुकशुकाट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *