‘रामदेव बाबाच्या नादी लागू नका’ अजितदादांनी डोक्यावर केसं गेल्याचं सभेतच दाखवलं

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ६ फेब्रुवारी । राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे आपल्या सडेतोड भाषणामुळे कायम चर्चेत असतात. आज कर्जतमध्ये झालेल्या जाहीर सभेत ‘साधू संतांचे ऐका पण बुवाबाजीच्या माग लागू नका, माझ्या डोक्यावरच केस गेले आहे’ असं म्हणत डोकच पुढे करून दाखवलं.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत या रोहित पवारांच्या मतदारसंघात अंबालिका कारखान्यावर शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी अजित पवार यांनी हजेरी लावली होती. यावेळी बुवाबाजीच्या नांदाला लागू नका असा सल्ला अजितदादांनी दिला.

माझी तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही सगळे नखाला नखं घासता का, अशी नखावर नखं घासली की, डोक्यावर केसावर केसं येतात. पण केसं यायचं तर बाजूला राहिलं, काही खरं नाही, असं म्हणत अजितदादांनी आपल्या डोक्यावर केसं नाही, असं दाखवण्यासाठी डोकच पुढे केलं होतं.

बुवा लोकांचं काही ऐकू नका, साधू संतांचे ऐका, महापुरुषांचा ऐका. अहिल्याबाई होळकर यांचं ऐका, शाहु-फुले-आंबेडकर असतील. मौलाना आझाद असतील त्यांचं ऐका. या सगळ्या महान व्यक्तींचं ऐका, पण, बुवाबाजीचं काही ऐकू नका.

नखाला नखं घासू नका, काही तरी तिसरच व्हायचं, डॉक्टरकडे गेल्यावर ते सुद्धा म्हणतील तुम्हाला कुणी करायला सांगितलं, त्यामुळे बुवाबाजीचं ऐकू नका, असा सल्ला अजितदादांनी देताच मेळाव्यात एकच हश्शा पिकला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *