भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या एका व्यक्तीला अटक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ११ फेब्रुवारी । भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या एका व्यक्तीला अटक (Arrest) करण्यात आली आहे. हमारा प्रसाद (Hamara Prasad) असं या व्यक्तीचं नाव आहे. हमारा प्रसाद याने एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. या व्हिडीओत त्याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बदनामीकारक विधानं केली होती. हा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर एकच खळबळ माजली होती. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. तेलंगणात (Telangana) हा सगळा प्रकार घडला आहे.

व्हिडीओत हमारा प्रसाद याने हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं पुस्तक पकडलं होतं. “आज जर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर ज्याप्रमाणे गोडसेने गांधींना ठार केलं त्याप्रमाणे मी त्यांची हत्या केली असती,” असं धक्कादायक विधान यावेळी त्याने केलं आहे. (I would have killed Ambedkar like how Godse shot Gandhi) हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ माजली होती.

“हैदराबाद शहरातील सायबर क्राइम पोलीस स्थानकाने हमारा प्रसाद याला अटक केली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अपमानजक विधान करत त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर फॉरवर्ड केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *