महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – नांदेड – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे़ मंगळवारी १८२ जणांच्या अहवालांची प्रतिक्षा होती़ त्यातील २८ जणांचा अहवाल सकाळी प्राप्त झाला़ त्यात एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. दरम्यान रात्री उशिरा आणखी १३७ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १२४ अहवाल निगेटिव्ह आले असले तरी आठ अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्याने नांदेड जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १०६ वर जाऊन पोहचली आहे़प्रलंबित असलेले १३७ कोरोना आवहाल नुकतेच आले आसून यात १२४ रिपोर्ट निगेटीव्ह तर ०८ रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. ०५ रिपोर्ट अवैध आले आहेत.
मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येने शंभरी ओलांडली असून ही संख्या १०६ झाली आहे.या आठ पैकी सहा जण एकाच कुटूंबातील असल्याचे सांगण्यात येते.
मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या स्वॅब तपासणी अहवालामुळे नांदेडकरांची चिंता अधिकच वाढली आहे. मंगळवारी सकाळी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर रात्री उशिरा १३७ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आणखी आठ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णांची संख्या १०६ वर गेली आहे.रात्री उशिरा बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये ५ पुरुष, दोन महिला आणि एका चार वर्षीय मुलाचा समावेश आहे
बाधीतांची संख्या १०६ वर गेली आहे. या पैकी ५ जनांचा मृत्यू झाला आसून ३० जन बरे झाले आहेत. २ फरार आसून इतरांवर उपचार सुरु आहे