महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – पिंपरी चिंचवड- विशेष प्रतिनिधी- लक्ष्मण रोकडे – चिंचवड मनपा आयुक्त आणि आमदार अण्णा बनसोडे थेट रस्त्यावर उतरून चिंचवड येथील कोरोना हॉट स्पॉट असलेल्या आनंदनगर परिसरातील नागरिकांची सोशल डिस्टन्सिंग ठेऊन भेट घेतली आणि कोरोना प्रसार रोखण्यासाठी प्रशासन करीत असलेल्या उपाय योजनांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार बनसोडे यांनी नागरिकांना शांत राहून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले.
आवश्यक मदत प्रशासनामार्फत करण्यात येईल तर कोणत्याही घरकाम करणाऱ्याचा रोजगार जाणार नाही, भाजी-पाला दुध अशा सर्व जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा करण्याचे नियोजन प्रशासन कडून करण्यात येईल असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले. तत्पूर्वी सकाळी या भागातील नागरीक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले होते. शहरात इतर ठिकाणी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन आहोरात्र प्रयत्न करीत आहे पण नागरिकांनी सुध्दा कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, ‘तुम्ही खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी घेतो’ असेही आवाहन लोकप्रतिनिधींनी यावेळी केले.
आमदार बनसोडे व आयुक्त हार्डीकर यांच्यासमवेत स्थानिक नगरसेवक शीतल उर्फ विजय शिंदे, शैलेश मोरे, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.