महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – बुलढाणा – विशेष प्रतिनिधी – गणेश भड – पाणीटंचाई निवारणार्थ दे.राजा तालुक्यातील 7, मलकापूरमधील 2, मेहकर तालुक्यातील 13, लोणारमधील 4, सिंदखेड राजामधील एक, मोताळा तालुक्यातील 7, जळगांव जामोदमधील 15, शेगांव 1 व नांदुरा तालुक्यातील एका गावासाठी 48 विंधन विहीरी मंजूर करण्यात आल्या आहेत. तसेच 9 कुपनलिकांची कामेही मंजूर आहेत. एकूण 51 गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी उपाय योजना करण्यात आल्या. विंधन विहीरी घेण्यात आलेल्या गावांमध्ये ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी करावयाचा आहे.
विंधन विहीरी सिंदखेड राजा तालुक्यातील किनगांव राजा, मोताळा तालुक्यातील आडविहीर, तालखेड, महालपिंप्री, बोराखेडी, चावर्दा, धामणगांव बढे व पान्हेरा, जळगांव जामोद तालुक्यातील रायपूर, गोराळा, गोरखनाथ, गोराडा जुना पाणी, वडपाणी, सोनबर्डी, कुंवरदेव, गोराळा प.सु, नांदुरा तालुक्यातील पोटा, मलकापूर तालुक्यातील वाघुड व हरसोडा, दे.राजा तालुक्यातील टाकरखेड भागीले, गिरोली बु, जुमडा, सावखेड भोई, चिंचखेड, डोढ्रा व डिग्रस बु, मेहकर तालुक्यातील देऊळगांव साकर्षा, घाटनांद्रा, उटी, निंबा, अंबाशी, पारडी, शिवपुरी, उसरण, चिंचाळा, बेलगांव, भालेगांव, सुळा व आरेगांव, लोणार तालुक्यातील पहूर, सरस्वती, सुलतानपूर व वडगांव तेजन या गावांसाठी विंधन विहीर मंजूर करण्यात आली आहे. तर जळगांव जामोद तालुक्यातील दाऊतपूर, काजेगांव, जामोद, टाकळी पारसकर, सुनगांव, चालठाणा, टाकळी खाती व शेगांव तालुक्यातील सगोडा या गावांसाठी कुपनलिका मंजूर करण्यात आलेल्या आहेत. यामुळे या गावांमधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास निश्चितच मदत मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.