महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १३ फेब्रुवारी । जानेवारी 2023 मध्ये किरकोळ महागाईमध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. यामुळे सर्व सामान्यांवर महागाईचा बोजा पुन्हा एकदा वाढला आहे.
Retail inflation rises to 3-month high of 6.52 pc in January: Govt data
— Press Trust of India (@PTI_News) February 13, 2023
सरकारने सोमवारी CPI वर आधारित किरकोळ महागाई दराची आकडेवारी जाहीर केली. जाहीर करण्यात आलेलील ही आकडेवारी RBI च्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त आहे.
जानेवारी 2023 मध्ये किरकोळ महागाईचा दर पुन्हा एकदा साडेसहा टक्क्यांच्या पुढे गेला असून, जानेवारीमध्ये किरकोळ महागाई दर 6.52 टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे.
हाच दर डिसेंबर 2022 मध्ये 5.72 टक्क्यांवर नोंदवण्यात आला होता. किरकोळ महागाईच्या दरातील ही वाढ तीन महिन्यातील सर्वोच्च उच्चांकीवर आहे. जानेवारीमध्ये खाद्यपदार्थांचा महागाई दर 5.94 टक्क्यांवर पोहोचला असून, डिसेंबर 2022 हाच दर 4.19 टक्के होता.