पिंपरी चिंचवड ; उन्हामुळे लिंबाच्या दरात वाढ

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १३ फेब्रुवारी । पिंपरी चिंचवड शहरात उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढत आहे. तसे किरकोळ बाजारात लिंबाचे दरही वाढत आहेत; तसेच गेल्या आठवड्यापेक्षा या रविवारी वांग्याचा दरही वाढल्याचे चित्र होते. तर किरकोळ बाजारात मेथी, पालक, कोथंबिरीची प्रति पेंडीची विक्री दहा रुपये दराने होत आहे.

शहरातील मोशी उपबाजार, पिंपरी, चिंचवड व आकुर्डी येथील भाजी मंडईमध्ये लिंबांना अधिक मागणी होती. मोशी उपबाजारात गेल्या आठवड्यात लिंबाची आवक 42 क्विंटल झाली होती. यावेळी 37 क्विंटल झाली. तर वांगी गेल्या आठवड्यात 70 क्विंटलवरून यावेळी 80 क्विंटलपर्यंत आवक झाली. घाऊक बाजारात लिंबाची विक्री 25 ते 30 रूपये प्रतिकिलो दराने झाली तर वांगी 20 ते 22 रूपये दराने विक्री झाली. तर मेथी, पालक, कोथिंंबीर 5 ते 7 रूपये दराने जुळीची विक्री झाली.

तसेच किरकोळ बाजारात लिंबू 60 ते 70 रूपये प्रतिकिलो, तर वांगी 50 ते 60 रूपये प्रतिकिलोने विक्री झाली. व पालेभाज्यांची प्रति जुळी दहा रूपये प्रमाणे विक्री झाली. आज बाजारात टोमॅटोची आवक 528 क्विंटल झाली असून, गेल्या आठवड्यापेक्षा 150 क्विंटलने वाढली आहे. तर कांदा 584 क्विंटल, बटाटा 324 क्विंटल, आले 37 क्विंटल, भेंडी 60 क्विंटल, मटार 225 क्विंटलची आवक झाली होती. पालेभाज्यांच्या एकूण गड्डी 58300 तर फळे 637 क्विंटल आणि फळ भाज्यांची आवक 3404 क्विंटल एवढी आवक झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *