या रेल्वे स्टेशनवर देशातील पहिलं ऑक्सिजन पार्लर ; मिळणार शुद्ध हवा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १४ फेब्रुवारी । वाढत्या प्रदूषणाचा धोका लक्षात घेता स्वच्छ ऑक्सिजन मिळणे ही सध्या अवघड झाल आहे. सर्वसामान्यांची ही अडचण लक्षात घेऊन नाशिकरोड रेल्वे स्टेशनमध्ये ऑक्सिजन पार्लर उभारण्यात आले आहे. देशातील हा पहिलाच प्रयोग आहे. नाशिककरांमध्ये याची चांगलीच उत्सुकता आहे. अनेक जण ऑक्सिजन पार्लरला भेट देऊन तिथली माहिती जाणून घेत आहेत. नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात पर्यटकांची नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

काय आहे वैशिष्ट्य?

24 तास सुरू असणाऱ्या ऑक्सिजन पार्लरमध्ये स्नेक,प्लांट आरेलिया, बुश, ड्रॅगन बांबू,चायनीज बांबू, मनीप्लांट, झामिया, झेड प्लांट, बोनझा, यासह एकूण 18 प्रकारची झाडं लावण्यात आली आहेत. ही सर्व झाडं प्रदूषण दूर करून ऑक्सिजन जास्तीत जास्त तयार करण्याचं काम करत असतात. नासाच्या अभ्यासात देखील या झाडांचं महत्त्व सांगितलं आहे.

ऑक्सिजन पार्लरमधील एक झाड 10 बाय 10 च्या परिसरातील हवा शुद्ध करण्याचं काम करत असतं, 24 तास ही झाडे ऑक्सिजन तयार करण्याचं काम करतात. त्याचबरोबर या झाडांना आठ दिवसातून एकदाच पाणी द्यावं लागतं. अशी प्रतिक्रिया ऑक्सिजन पार्लर व्यवस्थापक अमित अमृतकर यांनी दिली आहे.

रेल्वे स्टेशनला फायदा

रेल्वे स्टेशन म्हटलं की सहाजिकच या ठिकाणी प्रदूषण मोठ्या प्रमाणात असतो. प्रवाशांची नेहमी वर्दळ असते. स्वच्छ हवा आणि स्वच्छ ऑक्सिजन मिळणे या ठिकाणी अवघड असतं. त्यामुळेच हा प्रयोग रेल्वे प्रशासनानं सुरू केला आहे. नीम फ्रिज पॉलिसी अंतर्गत रेल्वे प्रशासनानं हा उपक्रम सुरू केला असून झाडांची विक्री करून प्रशासनला नफाही मिळत आहे.

 

नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात राबवलेला हा ऑक्सिजन पार्लर उपक्रम कौतुकास्पद आहे. इतर रेल्वे स्टेशन परिसरात देखील असे ऑक्सिजन पार्लर उभारण्याची गरज आहे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणात असते, या प्रदूषणामुळे आपल्याला विविध आजार देखील उद्भवतात, त्यामुळे स्वच्छ हवा स्वच्छ ऑक्सिजन आपल्याला घेण्याची गरज आहे, असं मत व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *