Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांची आज 393 वी जयंती…शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळा…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १९ फेब्रुवारी । मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (Maharashtra Shiv Jayanti Celebration) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मध्यरात्री मानवंदना देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केला. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच शिवजयंती साजरी करत आहेत.

जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा होत असून या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे उद्घाटन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते शिवनेरी च्या पायथ्याशी करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे पूजन करून येथे उभारण्यात आलेल्या शिवकालीन खेडे आणि विविध ग्रामीण खेळ संस्कृती पाहून स्वतः लोढा त्यामध्ये रमलेले पाहायला मिळाले.

किल्ले शिवनेरीवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला जाईल. थोड्याच वेळात जिल्हाधिकारी शिवाई देवीचं पूजन करणार आहेत. सकाळी 9 ते 11 पर्यंत शिवनेरी किल्ल्यावर फडणवीसांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सह सोहळा साजरा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *