महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २६ फेब्रुवारी । Driving Licence New Rules 2023 : नव्याने ड्रायव्हिंग लायसंस बनवणाऱ्यांसाठी सरकारने नवे अपडेट जाहिर केले आहेत. याअंतर्गत तब्बल ३५ वर्षांनंतर ड्रायव्हिंग लायसंसच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या अंतर्गत ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक ऑटोमेटीक करण्यात येणार आहे. यामुळे ड्रायव्हिंग टेस्ट पास करणं थोडं कठीण होणार आहे. कारण ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकमध्ये लागलेले सेंसर आणि सीसीटीव्हीच्या नजरेत टेस्ट घेतली जाणार होता.
अपघातात वाढ
ड्रायव्हिंग नीट न येणं तरीही ड्रायव्हिंग लायसंस मिळणं यामुळेच अपघातात वाढ झाल्याचं निदर्शनास आलं आहे. म्हणून हे नवे नियम बनवण्यात आले आहेत.
सध्या दिल्लीत ३ जानेवारीपासून मॅन्युअल ड्रायव्हिंग टेस्ट बंद करण्यात आली आहे. फेब्रुवारी एंड आणि मार्च पहिल्या आठवड्यात ऑटोमेटेड सिस्टीमची सुरुवात करण्यात आली आहे.
काय आहेत बदल?
सरकारने लर्निंग ड्रायव्हिंग लायसेंसच्या नियमांमध्ये बदल केला गेला आहे.
नव्या नियमांनुसार लर्निंग ड्रायव्हिंग लायसंस तुमच्या आधार कार्डमध्ये नोंद असलेल्या पत्त्याच्या जिल्ह्यात बनेल.
पण या निर्णयाने घाबरण्याचं कारण नाही. कारण यासाठी अर्ज कर्त्याला ऑनलाइन टेस्ट द्यावी लागेल.
याला आधार कार्ड लिंक करावं लागेल.
हा नवा नियम ऑनलाइन अर्ज करणाऱ्यांसाठी आहे.
ड्रायव्हिंग टेस्टचं व्हिडीओ रेकॉर्डिंग होईल.
ऑटोमेटेड ट्रायव्हिंग ट्रॅक मार्चमध्ये सुरु होईल.
यासाठी सेंसर आणि ओव्हरहेड कॅमेरे लावण्यात येणार आहे.
एका आठवड्यात ड्राय रन सुरु होणार.