महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २६ फेब्रुवारी । India vs Australia 3rd Test Playing-11 : भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 1 मार्चपासून इंदूर कसोटी सामना खेळल्या जाणार आहे. उभय संघांमधील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा तिसरा सामना आहे. भारतीय संघाने मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात दणदणीत विजय नोंदवत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. तिसर्या सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन संघातील अनेक खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत.
त्यामुळे कांगारू संघावर आता पराभवाचे सावट आहे. इंदूर कसोटी हरताच ऑस्ट्रेलियन संघ मालिका गमावेल. पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, अॅश्टन एगर, डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल स्वीपसन तिसऱ्या सामन्यातून बाहेर आहेत. लान्स मॉरिस, मॅथ्यू रेनशॉ आणि टॉड मर्फी यांनाही तिसर्या कसोटीतून वगळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत कांगारू संघावर पराभवाचे सावट आहे.
दिल्ली कसोटीनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स कौटुंबिक कारणांमुळे मायदेशी परतला. चौथ्या कसोटीसाठी तो पुनरागमन करू शकतो. कमिन्सच्या जागी स्टीव्ह स्मिथ संघाची धुरा सांभाळत आहे.
स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नरही कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या डाव्या कोपराला दुखापत झाली आहे. वॉर्नरच्या जागी ट्रॅव्हिस हेड सलामी करताना दिसणार आहे.
वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड खराब फिटनेसमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. अॅश्टन एगर आणि मिचेल स्वेप्सन यांना गेल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघात ठेवण्यात आलेले नाही.
लान्स मॉरिस, मॅथ्यू रेनशॉ आणि टॉड मर्फी यांनाही तिसऱ्या कसोटीतून बाहेर जाण्याची भीती आहे.