Pune Bypoll Election Results 2023 : चिंचवडमध्ये अश्विनी जगताप, कसब्यात रवींद्र धंगेकर आघाडीवर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ मार्च । संपूर्ण राज्याचं लक्ष आज जाहीर होणाऱ्या कसबा (Kasba Bypoll Results) आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या (Chinchwad Bypoll Results) निकालाकडे असणार आहे. आज (2 मार्च) सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार असून निकालाचे चित्र दुपारी 12 वाजेपर्यंच स्पष्ट होईल. दरम्यान राज्याचे विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना पोटनिवडणुकीचा निकाल येत असल्याने सत्ताधारी-विरोधकांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी, तिसऱ्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 7,996 मतांनी आघाडीवर, मविआच्या नाना काटे 7,349 मतांनी आघाडीवर. अपक्ष राहुल कलाटे 3,046 मतांनी आघाडीवर. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप, राष्ट्रवादीची नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत

कसबा पोटनिवडणुकीत मतमोजणी सुरु. पहिल्या टप्प्यात मविआचे रवींद्र धंगेकर आघाडीवर. धंगेकर 5,844 मतांनी आघाडीवर. तर भाजपचे 2,863 मतांनी आघाडीवर. लाल महालात रुद्रांश कानडे या लहान मुलांने ऑल द बेस्ट म्हणत धंगेकर यांना दिलं कॅडबरी चॉकलेट. कसब्यात भाजपचे हेमंत रासने आणि मविआचे रवींद्र धंगेकर यांच्यात जोरदार चुरस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *