![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ मार्च । गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत होती. आज मात्र सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे तर चांदीचे दर मात्र स्थिर आहे. येत्या काही दिवसावर होळी आहे आणि तुम्ही जर होळीच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोने तुम्हाला महागात पडण्याची शक्यता आहे.
गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 51,600 रुपये तर 24 कॅरेट साठी 56,200 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 668 रूपये आहे. (Gold Silver Price update 2 march 2023)
देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
पुणे – 56,290 रुपये
मुंबई – 56,290 रुपये
चेन्नई – 57,110 रुपये
दिल्ली – 56,440 रुपये
हैदराबाद – 56,290 रुपये
कोलकत्ता – 56,290 रुपये
लखनऊ – 56,440 रुपये
