‘तुरुंगात टाकून झालं आता फासावर लटकवा’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०३ मार्च । एक विशिष्ट गट जो बेकायदेशीरपणे शिवसेना आमची आहे, असं सांगतो आहे त्या गटाबद्दल मी बोललो आहे. त्यामुळे हक्कभंग होतो की नाही हे पाहावं लागेल. आज उत्तर नाही दिलं तर मला फासावर लटकवणार आहात का? लटकवा, तुरुंगात टाकून झालं आता फासावर लटकवा, असं म्हणत खासदार संजय राऊतांनी संताप व्यक्त केला.

‘हक्कभंग समिती ही पक्षपाती आहे मूळ शिवसेनेचा एकही सदस्य त्यात घेतलेला नाही ज्यांनी तक्रार दिलेली आहे त्यांनाच न्यायाधीश करण्याचा प्रकार केला. मी अजून नोटीस वाचली नाही माझ्या हातात अजून नोटीस पडलेली नाही. माझ्या हातात नोटीस असती तर मी इथून उत्तर देऊ शकलो असतो, इतक्या घाईघाईत कायदेशीर बाबींना उत्तर देता येत नाही मला कायद्याचा अभ्यास करावा लागेल, असंही राऊत म्हणाले.

या राज्यात सगळ्याच गोष्टी बेकायदेशीर सुरू असल्यामुळे सरकारच बेकायदेशीरपणे बसलेलं आहे. मी विधिमंडळाचा आणि आमदारांचा अपमान होईल असं मी काहीही म्हटलं नाही. एक विशिष्ट गट जो बेकायदेशीरपणे शिवसेना आमची आहे, असं सांगतो आहे त्या गटाबद्दल मी बोललेलो आहे, त्यामुळे हक्कभंग होतो की नाही हे पाहावं लागेल. आज उत्तर नाही दिलं तर मला फासावर लटकवणार आहात का? लटकवा, तुरुंगात टाकून झालं आता फासावर लटकवा, असंही राऊतांनी ठणकावून सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *