.’हे आशिया खंडातील सर्वात मोठं मार्केट ; ‘या’ मार्केटमध्ये करा जगभरातील स्वस्त मसाल्यांची खरेदी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०७ मार्च । रोजच्या जेवणात लागणारे मसाले स्वस्त दरात जिथं मिळतात त्या मुंबईच्या मार्केटबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत जगभरातील मसाले स्वस्त मिळणारं एक मार्केट आहे. अगदी कोरोनाच्या काळातही हे मार्केट अखंड सुरू होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच APMC मार्केट ही नवी मुंबईतील वाशीची वेगळी ओळख आहे. वाशी, तुर्भे, सानपाडा स्थानकापासून हे मार्केट जवळ आहे.या बाजारात हे मसाला मार्केट गेल्या 32 वर्षापासून सुरू आहे. तब्बल दोनशेपेक्षा जास्त व्यापाऱ्यांची याठिकाणी मसाल्याची दुकानं आहेत. काश्‍मीरी मिरची, मिरची, धने, हळद, दालचिनी, खसखस, लवंग, वेलची, जायफळ, खडा मसाला, जिरे, मोहरी, खोबर, चिंच यासह अनेक प्रकारचे मसाले इथं मिळतात.’हे आशिया खंडातील सर्वात मोठं मार्केट आहे. यामधील मसाला मार्केटला यंदा 32 वर्ष पूर्ण झाली आहेत

कोरोना काळात सरकारच्या विनंतीवरुन येथील कामगारांनी जीव धोक्यात घालून काम केलं होतं.सर्व प्रकारचे मसाले होलसेल भावात या मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. त्याच बरोबर मसाल्याचा दर हा दररोज चढता – उतरता असतोडी – विभागात होलसेल तर ई – विभागात रिटेल असे दोन्ही प्रकारचे मसाले तुम्हाला इथं मिळतात.मुंबईसह राज्यभरातील किरकोळ व्यापारी येथून मसाल्यांची खरेदी करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *