महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०७ मार्च । सध्या वातावरणात बरेच बदल पाहायला मिळत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडतोय. पुणे जिल्ह्यातही अवकाळी पाऊस कोसळतोय. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर अवसरी परिसरात काल रात्रीच्या सुमारास जोरदार गारपीटी झाली. अचानक पडलेल्या गारपीटीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात आणि अंगणात अक्षरश: गारांचा खच पडल्याचं पाहायला मिळालं. या गीरपीटीने बळीराजा चं मोठं आर्थिक नुकसान झालंय. शेतीमालाचे प्रचंड नुकसान झालंय. गारपिटीच्या या पावसाने बळीराजाचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. या पावसामुळे गहू, कांदा, हरभरा यांसह द्राक्ष, डाळिंब यांसारख्या फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.