महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०७ मार्च । नागरिक कर भरत नाही हे कोपरगाव नगरपालीकेचे कामाचे अपयश असून ज्या सुविधा देण्यासाठी नागरिक कर भरतात त्या देण्यात नगरपालिका अयशस्वी झाल्यानेच जनता कर भरत नाही. आणि त्यातच शास्ती (व्याज) हे मोठ्या प्रमाणावर लावत आहे/घेत आहे.
जनतेला नगरपालिकेकडून फक्त रोज स्वच्छ पिण्यायोग्य चांगले पाणी , खड्डेरहित चांगले रस्ते ,धूळ रहित गाव , चांगले आरोग्य सुविधा, दर आठवड्याला डासांसाठी औषध फवारणी ,मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त .नागरिकांना आवश्यक असणारे दाखले , बांधकाम परवानगी अगदी पटकन मिळावे . सर्व सोयी युक्त असे शहर करून ,जेणेकरून शहरात रोजगार उपलब्ध होईल व गावाची बाजारपेठ वाढेल , व्यापार वाढेल असे शहर करणे जनतेला अनेक वर्षांपासून अपेक्षित आहे. त्यातल्यात्यात एवढीच मुबलक अपेक्षा फक्त नागरिकांची नगरपालिकेकडून आहे.
जवळ जवळ 75 वर्ष होत आले स्वातंत्र्य मिळून आजही कोपरगावकरांना साधी पाणी पिण्याची मिळू शकत नाही याहून कुठलीच मोठी शोकांतिका नाही. ४२ कोटी खर्च होऊनही स्वच्छ पाणी मिळत नाही .याला जबाबदार कोण. तसेच मोठ मोठे निधी येऊन कमी दर्जेदार व पूर्ण होत नसतील तर ?
नगरपालिका ज्या पद्धतीने पट्टी वसूल करत आहे तिच्याविरुद्ध मानव अधिकार संघटनेकडे तसेच स्वातंत्र्यसैनिक आण्णाजी हजारे यांच्याही कानावर या गोष्टी घालाव्या लागणार आहेत .त्यांच्याकडे दाद मागावी लागणार आहे. नगरपालिके विरुद्ध तक्रार करावी लागणार आहे.
तरी नगरपालिकेला विनंती आहे की तुम्हाला शासन मोठा पगार देते त्याबदल्यात तुम्ही आम्हाला या सर्व सुविधा लवकरात लवकर कागदपत्री नव्हे तर प्रत्यक्ष लोकांना दिसतील जनतेला दिसतील अशी दर्जेदार करून करून दिलासा द्यावा व त्यानंतरच हक्काने पट्टी वसूल करावी ही नगरपालिकेला तमाम नागरिकांच्या वतीने माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांची विनंती.