अहमदनगर शहरातील अनेक भागात वादळी वाऱ्याच्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०७ मार्च । अहमदनगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसाचा पिकांना फटका बसला असतानाच अहमदनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरण परिसरात वादळी वाऱ्याच्या पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे मंगळवार (7 मार्च)ला शहरातील बहुतांशी भागाला पाणीपुरवठा होऊ शकला नाही.

अहमदनगर शहर व परिसरात सोमवारी रात्री विजेच्या कडकड्यासह वादळी वाऱ्याचा पाऊस झाला. सोमवारी मध्यरात्री देखील बहुतांशी भागात पावसाने हजेरी लावली होती. सोमवारी 6 मार्चला रात्री 9.50 पासून अहमदनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा नगर व पंपिंग स्टेशन परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. मंगळवारी सकाळी देखील हा वीजपुरवठा खंडितच होता. त्याच्या दुरुस्ती करण्याचे काम महावितरणने हाती घेतले आहे. अद्याप काम झालेली नाही.

वीज पुरवठा खंडित झाल्याने अहमदनगर शहराला पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मंगळवारी 7 मार्चला शहरातील बहुतांशी भागात पाणीपुरवठा विस्कळीत झालेला होता. काही कालावधीसाठी जरी वीज पुरवठा बंद पडला तरी वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर मुळा नगर येथून वेळेत पंपिंग स्टेशन येथे पाणी येण्यास तीन तासांचा कालावधी लागतो.

मंगळवारी अहमदनगर शहराच्या मध्य भागातील सिद्धार्थ नगर, लाल टाकी, दिल्लीगेट, नालेगांव, तोफखाना, चितळेरोड, आनंदी बाजार, माणिक चौक, कापडबाजार, नवीपेठ, जुने मनपा कार्यलय परिसर या भागांना उशीराने व दाबाने पाणी पुरवठा होत आहे. तरी नागरिकांनी असलेल्या पाण्याचा वापर कारकसरीने करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने मंगळवारी केले आहे. दरम्यान बुऱ्हानगर परिसराचा देखील पाणीपुरवठा मंगळवारी विस्कळीत झालेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *