महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .९ मार्च । शेतकऱ्यांच्या पाठिशी नेहमी उभे राहणार. राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहिर. शेतकऱ्यांच्या विम्याचा हप्ता देखील सरकार भरणार.
किल्ले शिवनेरीवर संग्राहलय उभारणार
तुकाराम महाराजांच्या ओवीचा अर्थसंकल्प वाचनाला सुरूवात
विधानपरिषदेत अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचा अर्थसकंल्प २०२३ मांडत आहेत.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी त्यांनी विधीमंडळाबाहेरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले.
राज्यातील सत्तांतरानंतर सत्तेवर आलेल्या सध्याची शिवसेना आणि भाजपा सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज गुरुवारी (दि.९) दुपारी विधिमंडळात सादर करणार आहेत. गेल्यावर्षी जूनअखेरीस सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. यावेळी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस प्रथमच विधिमंडळात अर्थसंकल्प मांडतील. या सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने विरोधीपक्षासह राज्यातील जनतेला याची विशेष उत्सुकता आहे.