या शहरात आता भीक मागण्यावर बंदी, पोलिसांकडून सक्त कारवाईचे आदेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९ मार्च । देशभरातील लहान-मोठ्या शहरातील चौकाचौकात भीक मागणारे दिसतात. यामुळे शहराचे विद्रुप आणि ओंगळवाणे दृश्य शहराबाहेरून येणाऱ्यांना पाहावे लागते अशी तक्रार केली जाते. वाहनचालक आणि पादचाऱ्यांनाही काही वेळा भीक मागणाऱ्यांमुळे समस्यांंना सामोरे जावे लागते. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत होते. मात्र आता वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या छळाच्या वाढत्या तक्रारींमुळे नागपूर पोलिसांनी बुधवारी शहरातील रस्त्यांवर, ट्रॅफिक सिग्नल्सवर, पदपथ आणि दुभाजक यांसारख्या ठिकाणी वाहनचालकांकडून पैसे मागणाऱ्यांवर 9 मार्च ते 30 एप्रिलपर्यंत बंदीचे आदेश लागू केले आहेत. पोलीस आयुक्तांनी या संदर्भात आदेश जारी केला असून यानुसार नागपुरात आता एकट्याने किंवा समूहाने भीक मागणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ बेगिंग ऍक्ट 1959 अंतर्गत करण्यात येणार आहे.

देशातील विविध शहरांमध्ये G20 शिखर परिषदेशी संलग्न कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. ज्या ज्या शहरांमध्ये हे कार्यक्रम आयोजित केले जात आहे त्या शहरांमंध्ये रंगरंगोटी आणि साफसफाईची कामे हाती घेतली गेली आहेत. नागपुरातही G20 चा एक कार्यक्रम होणार यानिमित्ताने नागपूर पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी भीक मागण्यास बंदी घातली आहे. जर कोणी भीक मागताना आढळून आल्यास कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Facebook
  • X (Twitter)
  • LinkedIn
  • Mix
  • More Networks
Copy link