महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० मार्च । निगडी येथील व्यापारी वर्गाला २००२/२००३ ह्या कालावधीत पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ह्यांनी रस्ता रुंदीकरण मध्ये जमीन संपादित केल्या गेल्या होत्या त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ह्यांना व्यापारी वर्गाला मोबदला मिळावा हा हेतू ठेवून पत्र व्यवहार करून संबंधित रस्ता रुंदीकरण बाधितांना पुनर्वसन करण्यात यावे म्हणून लेखी पत्राद्वारे मागणी केली होती.
त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ह्यांनी व्यापारी वर्गाला १० लाख रुपये रक्कम जमा करण्यासाठी सांगितली होती सदर रक्कम व्यापारी वर्गाने पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ह्यांच्या कडे रक्कम जमा केली होती त्या संदर्भात आमचं म्हणणं असे आहे की सदर जागा पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ह्यांनी परस्पर खरेदी विक्री व्यवहार करून बिल्डर ह्यांना विकली असून १३२ दुकान गाळा मालक रस्ता रुंदीकरण मध्ये बेघर झाले होते त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ह्यांना व्यापारी वर्गाला पुनर्वसन करण्यात यावे म्हणून लेखी पत्राद्वारे मागणी केली होती .
त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ह्यांनी सदर भूखंड खरेदी विक्री व्यवहार करण्यासाठी १० लाख रक्कम जमा करून घेतली होती आजतागायत व्यापारी वर्गाला जमीन भूखंड मिळाला नसून उलट सदर जमीन भूखंड पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ह्यांनी परस्पर खरेदी विक्री व्यवहार बिल्डर ह्यांच्या बरोबर करून करोडो रुपये किमतीच्या जमीनी कवडीमोल भावाने बिल्डर ह्यांना विकण्यात आली ,असून बिल्डर तुपाशी रस्ता रुदीकरण मधील व्यापारी उपाशी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे प्रशासनाचा भोंगळ कारभारामुळे व्यापारी रस्त्यावर आला असून संबंधित प्रकरणी दोषी अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी.
पेठ क्रमांक २४ मधील भूखंड क्रमांक ८/९ परस्पर खरेदी विक्री करून व्यापारी वर्गाला फसवणूक करण्यात आली पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ह्यांच्या कडून त्या संदर्भात कारवाई करण्यात यावी? सचिन काळभोर
सदर भूखंड खरेदी विक्री व्यवहार संदर्भात गंभीर चौकशी करून स्थगिती देण्यात यावी अन्यथा पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण कार्यालय ह्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करुन कामकाज बंद पाडण्यात येईल सचिन काळभोर सामाजिक कार्यकर्ते पिंपरी चिंचवड शहर यांनी पत्रा द्वारा माहिती दिली.