महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ मार्च । बॉलिवूड अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या निधनानंतर आताची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. सतीश कौशिक यांच्या निधनाबाबत एक धक्कादायक दावा समोर करण्यात आला आहे.माझ्या पतीने 15 कोटींसाठी सतिश कौशिक यांची हत्या केली असा दावा या महिलेनं केलाय. याबाबात तिने दिल्ली पोलिसांकडे तक्रारही केली आहे. या महिलेच्या दावानंतर एकच खळबळ माजली आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे सतीश कौशिक मृत्यूचं कनेक्शन दाऊदशी (Dawood Ibrahim) असू शकतं असा दावाही या महिलेने केला आहे.
सतीश कौशिकच्या मृत्यूमागे मित्र विकास मालूचा हात?
एका महिलेने दिल्ली पोलिसांकडे तक्रार दिली असून त्यात तिचा खून झाल्याचा दावा केलाय. ही महिला दुसरी कोणी नसून सतीश कौशिक यांची मैत्रीण आणि व्यापारी विकास मालू यांची पत्नी आहे. 15 कोटींच्या वादातून तिच्या पतीने सतीश कौशिकची हत्या केल्याचा महिलेचा दावा आहे. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत महिलेने म्हटलंय की, काही वर्षांपूर्वी तिच्या पतीने सतीश कौशिककडून 15 कोटी रुपये घेतले होते. मात्र पतीकडे देण्यासाठी पैसे नसल्याने या वादातून त्याने ही हत्या केली. दरम्यान विकास मालू (vikas malu) दिल्लीतील फार्महाऊसचा मालक असल्याचं सांगितलं जातंय.
सतीश कौशिक मृत्यूचं कनेक्शन दाऊदपर्यंत?
दुबईत एका पार्टीत दोघांमध्ये भांडण झाल्याचा दावाही या महिलेनं केलाय.. तसंच या पार्टीता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मुलगाही हजर होता असा खुलासाही या महिलेनं केलाय..
सतीश कौशिक यांच 9 मार्च 2023 ला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. सतीश कौशिक शेवटचे मुंबईतील होळीच्या पार्टी दिसले होते. या सेलिब्रेशनचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. सध्या सतीश कौशिक यांच्या मृत्यूवर अनेक गोष्टी समोर येतं आहेत. त्यामुळे दिल्ली पोलीस याचा तपास करत आहे. दरम्यान अभिनेत्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं म्हटलं आहे. मात्र अजून सतीश कौशिकच्या रक्ताचे नमुने आणि हृदयाच्या अहवाल आलेला नाही.