MK Stalin: तेव्हा इंदिरा गांधी यांचे ऐकलं असत तर…एमके स्टॅलीन यांचा मोठा दावा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ मार्च । तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. इंदिरा गांधींनी द्रमुकला आणीबाणीला विरोध न करण्याची विनंती केली होती. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री एम करुणानिधी यांनी त्यांचे ऐकले नाही. त्यामुळेच नंतर एम करुणानिधी यांचे सरकार पडले. असा मोठा दावा स्टॅलिन यांनी केला आहे. (Indira Gandhi Urged DMK Not To Oppose Emergency Says MK Stalin )

मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी शनिवारी एका जाहीर सभेला संबोधित केले. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी शनिवारी एका जाहीर सभेला संबोधित करताना सांगितले की, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी करुणानिधींना 1975 मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला विरोध करू नये हे सांगण्यासाठी त्यांचे दूत पाठवले होते.तसेच त्यांनी विनंतीकडे लक्ष न दिल्यास द्रमुकचे सरकार बरखास्त होऊ शकते. असे गांधी यांनी सांगितले होते.

इंदिरा गांधींनी संकटातून स्वतःला वाचवण्यासाठी देशात आणीबाणी लागू केली होती, त्यानंतर अनेकांना अटक करण्यात आली होती आणि अनेक नेत्यांवर मीसा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तामिळनाडूत आमचे सरकार होते. इतक्यात करुणानिधींसाठी मेसेज आला. दिल्लीतून. इंदिरा गांधींच्या दूतांनी त्यांना सांगितले की, तुम्ही आणीबाणीला विरोध करू नका, तुम्ही तसे केल्यास द्रमुकचे सरकार एका सेकंदात पडेल.

मात्र, विरोध करत करुणानिधी यांनी मला माझ्या जीवाची पर्वा नाही, लोकशाही मला महत्त्वाची आहे, असं सांगितलं. त्यानंतर करुणानिधी यांनी आणीबाणीच्या विरोधात ठराव मांडला, त्यानंतर लगेचच डीएमके सरकार बरखास्त करण्यात आले. असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *