Vaibhav Naik: कोकणातला हा आमदार शिंदे गटात जाण्याची चर्चा झाली अन् उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ मार्च । ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला. आमदार वैभव नाईक शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा असल्याने जिल्हाप्रमुख पदावरून त्यांना हटवण्यात आल्याचे राजकीय गोटात सांगण्यात येत आहे. मात्र, नाईक यांनी या चर्चेला फटकारले आहे. ( Uddhav Thackeray removed from the post of District Chief mla Vaibhav Naik )

नव्या नियुक्तिमध्ये संदेश पारकर, सतीश सावंत आणि संजय पडते या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हे शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय रंगली होती. यामुळे त्यांना पदावरून हटवल्याचे बोलेले जाते. मात्र आपल्याकडे पक्षवाढीसाठी जबाबदारी दिल्याने, जिल्हाप्रमुख पद काढून घेतले आहे, असे स्पष्टीकरण नाईक यांनी माध्यमांना दिली आहे.

आता निष्ठावान समजले जाणारे नाईक यांचीच महत्त्वाच्या पदावरून गच्छंती झाल्याने, पक्षांतर्गत टिकेचा सूर उमटू लागल्याचे सूत्रांची माहिती आहे. नाईक यांना पदावरून हटवल्यानंतर, नव्याने ज्यांची नियुक्ती करण्यात आली, ते पूर्वी राणे समर्थक असल्याचे बोलले जात आहे.

नाईक काय म्हणाले?
भाजप आणि शिंदे गटात येण्यासाठी अनेक लोक मागे लागले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. या दबावाला झुकारुन मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहिलोय. गेले १५ वर्ष मी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम केलं आहे. तरुणांना आता संधी दिली आहे. मी आता जिल्ह्याबाहेर काम करणार आहे. त्यामुळे ठाकरेंनी मला हटवलं असले. अशी प्रतिक्रिया नाईक यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *