गाेदातीरी चार लाख भाविकांची मांदियाळी, नाथषष्ठी उत्सवाला सोमवारपासून सुरुवात

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ मार्च । नाथषष्ठी उत्सवाला सोमवारपासून सुरुवात झाली. राज्यभरातून दिंड्या, पताका घेत सुमारे ४ लाख वारकऱ्यांची मांदियाळी नाथसागर धरणाजवळ जमली. पंढरपूरच्या वारीनंतर नाथषष्ठीची वारी ही सर्वात मोठी असते. येथे दिंडीतील वारकरी घरच्या देव्हाऱ्यातील देव आणतात व या देवांना गोदाकाठावर स्नान घातले जाते. राज्यभरातून नाथषष्ठी उत्सवात 550 दिंड्या सहभागी झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *