महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ मार्च । अहमदनगर येथील कोपर्डीत बोअरवेलमध्ये पडलेल्या पाच वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा चिमुकला साडेआठ तास बोअरवेलमध्ये अडकला होता. कोपर्डी येथील काकासाहेब सुद्रिक यांच्या बोअरवेलमध्ये हा मुलगा पडल्याची माहिती आहे. या बोअरवेलमध्ये तब्बल ११ फूट खाली हा चिमुरडा अडकला होता. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि अग्निशामन दलाचे जवान दाखल झाले मात्र त्यांच्या शर्तीच्या प्रयत्नाना अपयश आले. टीव्ही ९ हिंदी या वृत्तवाहिनीनुसार, या मुलाला मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.