महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष; हा निकाल लोकशाहीचं भवितव्य ठरवेल, कपिल सिब्बल यांचं भावनिक आवाहन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ मार्च । महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद सुरू आहेत. बुधवारी झालेल्या युक्तिवादानंतर गुरुवारी पुन्हा एकदा ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आणि पक्षाची बाजू मांडली.

यावेळी कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद संपवत असताना सर्वोच्च न्यायालयात न्यायालयाच्या उज्ज्वल इतिहासाचीदेखील आठवण करून देत भावनिक आवाहन केलं.

कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद संपवताना अत्यंत मुद्देसूदपणे राज्यपालांनी शिंदेंना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करण्याचा घेतलेला निर्णय रद्द ठरवण्याची मागणी केली. ‘या न्यायालयाचा इतिहास हा संविधानाच्या मूल्यांच्या उत्सवाचा इतिहास आहे. एडीएम जबलपूर देखील घडले. या प्रकरणावरून लोकशाहीचं भवितव्य ठरवेल आणि खरोखरच ऐतिहासिक असेल. अन्यथा माझा विश्वास आहे की या न्यायालयाच्या हस्तक्षेपाशिवाय लोकशाही वाचवता येणार नाही आणि कोणतंही सरकारला टिकू दिले जाणार नाही. म्हणूनच मी विनंती करतो या याचिकेचा स्वीकार करण्यात यावा आणि राज्यपालांची कारवाई रद्द करण्यात यावी’, अशी विनंती कपिल सिब्बल यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *