“बेकायदेशीरपणे व्यापार्यांसाठीची मिळकत विकल्या प्रकरणी ठिय्या आंदोलन” – सचिन काळभोर

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 :आकुर्डी – पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाच्या हद्दीतून जाणाऱ्या मुंबई पुणे रस्त्याच्या रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या निगडी गावाच्या हद्दीतील व्यवसायिकांना विशेष बाब म्हणून पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाच्या सभा क्र २६० दिनांक २८ ऑक्टोबर २००५ रोजी पारित करण्यात आला होता. सदर ठरावानुसार पेट क्रमांक २४ दुय्यम सुविधा केंद्रातील भूखंड क्र ८ व ९ अंदाजे क्षेत्रफळ ३८०० चौ.मी चे वाटप करण्यासंदर्भात पत्र निगडी व्यापारी संघटना यांच्या अध्यक्षाच्या नावे दिले आहे.

असे असताना सदर निगडी व्यापारी संघटना यांनी सदर बाबीचा वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे सदर व्यापारी संघटनेने आपल्या पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आकुर्डी पुणे ३५ यांच्या मागणीनुसार रक्कम रुपये किती १०,००,००० चे चलन हे दिनांक १५ फेब्रुवारी २००६ रोजी भरलेले असून सदर भरणा पावतीची प्रत प्राधिकरणाकडे उपलब्ध आहेत. प्राधिकरणाने सांगितलेल्या अटी व शर्तीचे पालन केलेले असतानाही आत्ताच्या पी एम आर डी ए च्या कार्यालयीन अधिकारी यांनी बेकायदेशीरपणे निगडी व्यापारी संघटना यांच्यासाठी राखीव असलेली मिळकत शहरातील नामांकित बांधकाम व्यवसायिकास वाढीव दराने विकलेली आहे. ही बाब व्यावसायिकांवर अन्याय करणारी आहे, त्याचमुळे दिनांक २८ मार्च २०२३ रोजी दुपारी १२ वा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आकुर्डी च्या निषेधार्थ एक दिवशीय ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *