५४ हजार ७५८जणांचे नमूने पॉझिटिव्ह तर राज्यात आतापर्यंत १६ हजार ९५४ कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे ; आरोग्यमंत्री राजेश टोपे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई -राज्यात मंगळवारी कोरोनाच्या २०९१नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या ३६ हजार ४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल २२६८ रुग्ण बरे होवून घरी गेले असून आतापर्यंत १६ हजार ९५४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आत्तापर्यंतच्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५४ हजार ७५८ एवढी आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ९० हजार १७० नमुन्यांपैकी ५४ हजार ७५८जणांचे नमूने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ६७ हजार ६२२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५ हजार २०० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

राज्यात ९७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद काल झाली असून एकूण संख्या १७९२ झाली आहे. मंगळावारी नोंद झालेल्या मृत्यूपैकी ३५ मृत्यू हे मागील दोन दिवसातील आहेत. तर उर्वरित दोन मृत्यू हे १७ एप्रिल ते २३ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६२ मृत्यूपैकी मुंबईचे १९, ठाण्याचे १५, कल्याण-९डोंबीवलीचे ९, सोलापूरचे ६, मिरा-भाईंदरचे ५, उल्हासनगरचे ३, मालेगावमधील ३ तर पुण्यातील एक आणि औंरगाबादमधील १ मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये 3३९, पुण्यात ८, ठाणे शहरात १५, औरंगाबाद शहरात ५, सोलापूरात ७, कल्याण डोंबिवलीमध्ये १०, मीरा-भाईंदरमध्ये ५, मालेगाव आणि उल्हासनगर मध्ये प्रत्येकी३, नागपूर शहरात १, रत्नागिरीमध्ये १ मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *