Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ मार्च । महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीट याचा सर्वाधिक फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकरी (Farmer) अडचणीत सापडला आहे. ऐन रब्बी हंगामातील पिके काढणीस आलेली असताना, अवकाळीचा फटका बसल्याने बळीराज्याला अश्रू अनावर झालेत. (Latest Marathi News)

राज्यात यलो अलर्ट जारी

दरम्यान हवामान विभागाकडून राज्यात पुन्हा पावसाचा यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

हवामान खात्याकडून नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातील हिंगोली, नांदेडसह लातूर या भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातील अकोला, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात गारपिठ आणि वादळी पाऊस (Rain) होण्याची शक्यता आहे वर्तवण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाचा हजारो हेक्टरवरील पिकांना फटका बसला तर काही ठिकाणी पिकांचं नुकसान झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आणखी तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.

गेल्या काही दिवसांपासून विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावली. तर राज्यातील काही ठिकाणी जोरदार गारपिटीनेही तडाखा दिला आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *