पुणे- मुंबई विमान सेवेला अखेर हिरवा कंदील, एअर इंडियाकडून तिकीट बुकिंगला सुरूवात

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ मार्च । तब्बल पाच वर्षानंतर पुणे ते मुंबई विमानसेवेला आता सुरुवात होणार आहे. एअर इंडिया मार्फत सध्या ही सेवा सुरू करण्यात येत असून 26 मार्चपासून पुणेकरांना पुणे मुंबई हा प्रवास करता येणार आहे. त्याचे बुकिंग सध्या सुरू झाले आहे.

पूर्वी जेट एअरलाइन्स मार्फत पुणे मुंबई विमानसेवा पुरवली जात होती. मात्र 2019 मध्ये ही सेवा बंद करण्यात आली होती. पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी आणि मुंबईहून पुण्याला येण्यासाठी नागरिकांना बाय रोड किंवा रेल्वेने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे नागरिकांना पुणे मुंबई प्रवासासाठी तीन ते चार तास मोजावे लागत होते. मात्र आता ही सेवा सुरू झाल्यामुळे नागरिकांना पुणे मुंबई हा प्रवास फक्त एका तासात करता येणार आहे.

– शनिवार वगळता सहा दिवस विमान उड्डाणे…
– पुण्याहून उड्डानाची वेळ – सकाळी 11:20 वा.
– मुंबईत पोहोचण्याची वेळ – दुपारी 12:20 वाजता
– विमान उड्डाणाचा वेळ – १ तास
– 114 नियमित इकॉनॉमी क्लास सीट
– 8 बिझनेस क्लास सीट्स

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *