सोशल मीडिया कंपन्या बंद करु; डोनाल्ड ट्रम्प यांचा सोशल मीडिया कंपन्याना इशारा

Spread the love

Loading

आपल्या ट्विटला फॅक्टचेक अंतर्गत अधोरेखित करत ते दिशाभूल करणारे असणं म्हणणं म्हणजे एक प्रकारे आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणंच आहे, असं म्हणत ही कार्यपद्धती तातडीने बदलण्याची मागणी त्यांनी केली.महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – व़ॉशिंग्टन : मंगळवारी सकाळच्या सुमारास त्यांनी एकमागोमाग एक काही ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली. ट्विटरकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विट फॅक्टचेकअंतर्गत अधोरेकिथ केल्यानंतर सोशल मीडिया कंपन्या आणि विशेष म्हणजे ट्विटरवर त्यांचा रोष ओढावला आहे. सोशल मीडिया कंपन्यांना चांगलीच शिस्त लावण्याचा आणि तसं न झाल्यास या कंपन्या बंद करण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिल्याचं म्हटलं जात आहे.

ट्रम्प यांनी सोशल मीडिया कंपन्यांना हा इशारा दिला असला तरीही या कंपन्यांच्या भविष्याविषयीचा निर्णय घेणं हे त्यांच्या हाती नसल्याचंच प्रत्यक्षात स्पष्ट होत आहे. मुळात या कंपन्या सार्वजनिक तत्त्वांवर चालत असून त्यांच्याकडून पुरवण्यात येणाऱ्या बहुतांश सुविधांचा कोट्यवधी नागरिक उपभोग घेत आहेत.

संपूर्ण जगभरात या सोशल मीडिया कंपन्यांचं जाळं विविध मार्गांनी पसरलं आहे. त्यामुळं ट्रम्प यांचा हा इशारा नेमका कोणत्या बळावर आहे, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.

मुख्य म्हणजे ट्विटरच्या माध्यमातून सोशल मीडिया कंपन्यांना धमकावणाऱ्या ट्रम्प यांनी कोणत्याही माध्यमाचा उल्लेख करणं टाळलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *