महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ मार्च । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 6 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील आमदार आणि खासदारांसह मुख्यमंत्री शिंदे अयोध्या दौऱ्याला जाण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा होती. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी अयोध्येमध्ये जाऊन आले होते.