महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ मार्च । पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सचिन दोडके यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दोडके यांच्यासह ५-६ कार्यकर्त्यांवर मारहाण, तसेच शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. वारजे पोलिस ठाण्यात भाजपचे कार्यकर्ते वासुदेव भोसले यांनी फिर्याद दिली आहे. पुणे शहरातील वारजे भागात गेल्या अनेक वर्षांपासून सचिन दोडके नगरसेवक आहेत.