Gold Silver Price Today : सोन्या चांदीच्या भावात घसरण ; पहा आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ मार्च । आज सोन्या चांदीच्या दरवाढीला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. गेल्या गुरुवारी, 16 मार्च रोजी सकाळी सोन्याच्या चांदीच्या किंमती घसरल्या होत्या. तोच कित्ता या गुरुवारी सोन्याने गिरवला. सोन्यात मोठी घसरण झाली. त्यापाठोपाठ चांदीने पण हापकी खाल्ली. चैत्र शुद्ध प्रतिपदेनंतर शुद्ध सोने आणि चांदीचा (Gold Silver Price Today) भाव स्वस्त झाला. आज खरेदीचा चांगला मुहूर्त आहे. रविवारी 24 कॅरेट सोने 60,470 रुपये तोळा झाले होते. त्यापूर्वी 2 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव 58,880 रुपये प्रति तोळा होता.

22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भावात आज जबरी घसरण झाली. 22 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 800 रुपयांची घसरण झाली. आज सकाळी हा भाव 54,350 रुपये आहे. तर रेकॉर्डस्तरावरुन 24 कॅरेट एक तोळा सोने आज स्वस्तात खरेदी करता येईल. आज हा भाव 59,280 रुपये आहे. तोळ्यामागे 870 रुपयांची घसरण झाली. चांदी किलोमागे 500 रुपयांनी घसरली आहे. चांदीचा भाव 71,600 हजार रुपये किलो आहे. गुडरिटर्न्सने हे ताजा भाव जाहीर केले आहेत. आयबीजेएने अजून भाव अपडेट केलेले नाहीत. हे सकाळचे भाव आहे. शहरानुसार भावात तफावत आहे.

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *