महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ मार्च । सामान्य नागरिक ह्यांचे लाईट बील एक हजार रुपये थकबाकी असले तर वि.वि.कपनीचे कर्मचारी नागरिकांच्या घरी येऊन लाईट तोडून कारवाईचा बडगा उगारत आहे दुसरीकडे लाईट कनेक्शन तोडल्या नंतर दोनशे रुपये दंड ठोठावला जात आहे तर अवैध मार्गाने वीज वितरण कंपनीच्या वतीने चोरुन वीज वापर करण्यावर कारवाई होत नाही.
भोसरी डिव्हिजन कडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून, याच मुले भविष्यात मोठा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. तारेवर आकडे टाकून प्रतिमहिना ३०० रु. आकारून वीज वापर होत असेल तर हि गंभीर बाब आहे. या संदर्भात दखल घेऊन त्वरित कारवाई करावी असे निवेदन सचिन काळभोर यांनी महावितरण कंपनीला केले.
नवीन लाईट मीटर घेण्यासाठी नागरिकांना २५०० रुपये भरावे लागत आहे तर जो अधिकारी कर्मचारी नवीन मीटर कनेक्शन जाईट करणार आहे त्यांना तीन ते चार हजार रुपये चिरीमिरीत द्यावे लागत आहे नागरिकांना वीज वितरण कंपनीच्या वतीने जास्त रक्कमेचा लाईट बील देण्यात येत आहे तो कमी करुन घेण्यासाठी सुद्धा वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागत आहे सचिन काळभोर सामाजिक कार्यकर्ते पिंपरी चिंचवड शहर