![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ मार्च । भारतात ई-पेमेंटसाठी अग्रेसर असलेली अन् आर्थिक सेवा देणारी कंपनी पेटीएम बद्दल तर आपल्याला माहीती आहेच, या कंपनीच्या पेरेंट कंपनी अर्थात वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड (ओसीएल) ने आज पेटीएम सुपर अॅप वापरकर्त्यांना ‘कॅन्सल प्रोटेक्ट’सह ट्रेन तिकिट बुकिंग्जवर फ्री कॅन्सलेशनची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
‘कॅन्सल प्रोटेक्ट’ कव्हरसह युजर्स ट्रेन तिकिटाच्या नियोजित वेळेच्या किमान ६ तास आधी किंवा चार्ट तयार होण्यापूर्वी, यापैकी जे काही आधी असेल तेव्हा पेटीएमद्वारे कॅन्सल केलेल्या ट्रेन तिकिट बुकिंगवर १०० टक्के इन्स्टंट रिफंड क्लेम करु शकतात. ‘कॅन्सल प्रोटेक्ट’ प्रवाशांना कोणतेही प्रश्न न विचारता कुठेही, कधीही, नियमित आणि तत्काळ रेल्वे तिकिटे रद्द करण्यास उपलब्ध आहे.
पेटीएमसह युजर्स पेटीएम यूपीआयच्या माध्यमातून ट्रेन तिकिटांवर झेरो पेमेंट रिफंडचा आनंद घेऊ शकतात. युजर्स तत्काळ तिकिटे बुक करु शकतात, लाइव्ह ट्रेन रनिंग स्टेटस चेक करु शकतात, प्लॅटफॉर्म क्रमांक ट्रॅक करु शकतात आणि पेटीएम किंवा इतर प्लॅटफॉर्म बुक केलेल्या सर्व तिकिटांचे पीएनआर तपासू शकतात.