महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २६ मार्च । गेल्या काही वर्षांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत, आता ऐन उन्हाळ्यात गारपीट आणि अवकाळी पावसाचा शिडकावा होतो. आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सोलर अॅक्टिव्हिटी वाढल्यामुळे वातावरणातील कोरडेपणा वाढला आहे, त्यामुळे यावर्षी कडक उन्हाळ्याचे दिवस कमी राहणार असल्याचे एमजीएम विज्ञान केंद्राचे संचालक, तसेच हवामान अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.
वातावरणात होत असलेल्या बदलाबद्दल औंधकर म्हणाले की, या वर्षी सलग कडक उन्हाळ्याचे दिवस कमीच राहणार आहेत, वाढत्या प्रदूषणामुळे वातावरणामुळे आणि उन्हाळ्यामुळे या अतिनील किरणांचं प्रमाण अनेक पटींनी वाढलेलं आहे. सूर्यप्रकाशात अतिनील किरणांचा स्थिरांक छत्रपती संभाजीनगर शहरात ३. २ तर शहराबाहेर हा स्थिरांक ७ पर्यंत जातो, ही संख्या जास्त आहे. शहरात मोठमोठ्या इमारतींमुळे उष्णतेचे वारे कमी प्रमाणात वाहतात, तर याच वाऱ्यांचे प्रमाण शहराबाहेर अधिक असल्याचे दिसून येते. यामुळे ड्रायनेस आणि धुळीची प्रमाण अधिक असते, यावर्षी केवळ एप्रिल आणि मे या महिन्यांमध्येच काही दिवस सलग कडक उन्हाळ्याचे दिवस दिसतील, तर उरलेल्या दिवसांमध्ये कधी ढगाळ वातावरण, तर कधी पावसाचा शिडकावा अशी स्थिती राहणार आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून सोलर अॅक्टिव्हिटी वाढली आहे, २०१९ मध्ये सूर्यडागांची सुरू झालेल्या साखळीचा क्रमांक निर्धारित कालावधीपूर्वीच वाढला आहे, या साखळीतील वाढलेली जी आकडेवारी २०२५ मध्ये अपेक्षित होती, ती फेब्रुव- री- मार्च २०२३ मध्येच दिसून येते, त्यामुळे ड्रायनेस वाढला आहे, सूर्यावरील उत्सर्जन तसेच सौर वादळे वाढल्यामुळे पृथ्वीवर हीटवेव्ह वाढल्या असल्याचे औंधकर यांनी सांगितले.
यंदा पाऊस तुलनेत कमीच
यावर्षी मराठवाड्यात कधी ऊन तर कधी गारपीट अशी स्थिती आहे. येणाऱ्या पावसाबद्दल औंधकर म्हणाले की, गेल्या काही वर्षांत मराठवाड्यात अपेक्षितपेक्षा अधिक पाऊस झाला, धरणे तुडुंब झाली, नोव्हेंबर, डिसेंबरमध्येही पावसाचा शिडकावा झाला, मात्र यावर्षी वातावरणात होत असलेल्या बदलामुळे अशी स्थिती राहणार नाही, यावर्षी सरासरीपेक्षा काहीसा कमी पाऊस होणार असल्याचे औंधकर यांनी केली.