Amritpal Singh : अमृतपालला पंजाबमध्ये घेरले? सुवर्ण मंदिरात करु शकतो आत्मसमर्पण! हाय अलर्ट जारी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२९ मार्च । खलिस्तानी वारिस दे पंजाब संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंहला पोलिसांनी घेरले आहे. ११ दिवसांपासून तो पोलिसांना चकमा देत आहे. तो जिथे जाईल तिथे पोलीस त्याचा पाठलाग करत आहेत. पंजाब पोलिसांशिवाय दिल्ली, हरियाणा पोलीस देखील त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान आज-तकने दिलेल्या माहितीनुसार अमृतापाल सुवर्ण मंदिरात आत्मसमर्पण करण्याची तयारी करत आहे. त्यामुळे पंजाब पोलीस अलर्ट मोडवर आहे. सुवर्ण मंदिरात परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

पंजाब पोलिसांना अमृतपाल होशियारपूर येथे लपून बसल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी फगवाडा एका कारचा पाठलाग केला होता. या कारमध्ये अमृतपाल असल्याची शंका पोलिसांना होती. कारमध्ये बसलेले लोक गाडी सोडून मारनियातील गुरुद्वाराजवळ पळून गेले.

यानंतर मारनियान गावात आणि परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.अमृतपालला पकडण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा घरोघरी जाऊन कारवाई केली.

अमृतपाल सिंह एका आंतरराष्ट्रीय चॅनलला मुलाखत देण्यासाठी जलांधरला जात होता. आधी मुलाखत देऊ त्यानंतर आत्मसमर्पण करु, असा त्याचा प्लॅन होता. मात्र पोलिसांनी ही माहिती मिळाली. त्यामुळे त्याचा प्लॅन फसला. आता त्याच्याकडे आत्मसमर्पण करण्यापासून पर्याय नाही कारण पोलिसांनी त्याला घेरले आहे.

कोण आहे अमृतपाल?

अमृतपाल हा ‘वारीस पंजाब दे’ संस्थेचा प्रमुख आहे. तो काही दिवसांपूर्वी दुबईहून परतला आहे. पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याने वारिस पंजाब दे संघटनेची स्थापना केली होती. दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर अमृतपालने ते ताब्यात घेतले. तो भारतात आला आणि संस्थेतील लोकांना जोडू लागला. अमृतपालचा आयएसआयशी संबंध असल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *