पुणे जिल्ह्यात कोरोनाला कसं आवरणार? रोज वाढतात पॉझिटिव्ह रुग्ण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – राज्यात कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पुण्यातही कोरोचा प्रसार वाढतच चालला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहर आणि जिल्ह्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर तब्बल 302 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या वाढत्या आकड्यामुळे पुणेकरांची चिंता आणखी वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दिवसभरात 186 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 7314 तर मृतांची संख्या 327 वर पोहोचली आहे. बाधितांमध्ये पुणे शहरातील 6155, पिंपरी चिंचवडमधील 495, पुणे ग्रामीणमधील 266, पुणे कंटेनमेंट आणि जिल्हा रुग्णालयातील 398 रुग्णांचा समावेश आहे. एकीकडे असं असताना दुसरीकडे, लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे मुंबईहून गावी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ज्या गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव नव्हता तिथेही आता कोरोनाची नवी प्रकरणं समोर येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *