शरद पवार- नितीन गडकरी यांच्या भेटीने अनेकांना धक्का

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१ एप्रिल । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Sharad Pawar Meet Nitin Gadkari) यांच्या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. एकीकडे राज्यात भाजप विरोधात राष्ट्रवादीचे आरोप प्रत्यारोप सुरू असताना गडकरी-पवार यांच्या भेटीने अनेकांना धक्का दिला आहे. विशेष म्हणजे गडकरी यांच्याकडे पवार यांनी स्नेहभोजनही घेतले.

शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपकेंद्र असलेली विदर्भातील शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण संस्था लवकरच नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात सुरू होत आहे. आज या जागेची शरद पवार यांनी पाहणी केली. या संदर्भातील चर्चेसाठीच ही गडकरी-पवार यांची भेट होती. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, माजी आमदार डॉ. आशिष देशमुख उपस्थित होते.

आज नागपुरात उत्तर-दक्षिण नागपूरला जोडणाऱ्या सर्वात मोठा ९.८ किमी उड्डाणपूल भूमीपूजनासह विविध कार्यक्रमांसाठी, जाहीर सभांमधून गडकरी-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्रित आहेत. या पार्श्वभूमीवर या भेटीने पवार आणि गडकरी यांचे विकासासाठी असलेले मैत्रीपूर्ण संबंधही पुन्हा एकदा उघड झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *