महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ एप्रिल । अल्लू अर्जून अभिनित ‘पुष्पा 2’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक आहे. सिनेमाशी संबंधित छोट्यातील छोट्या अपडेटविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येतेय. ‘पुष्पा’ सिनेमा हिट झाल्यानंतर नेहमी ट्वीटरवर ‘पुष्पा 2’ चं हॅशटॅग ट्रेन्ड होताना दिसत आहे.
यादरम्यान आता बातमी आली आहे की ज्यामुळे चाहते नाराज होऊ शकतात. पुष्पा डिसेंबर 2021 मध्ये रिलीज होणार होता. याचा सीक्वेल यावर्षाच्या शेवटी पूर्ण होईल असं बोललं जात होतं पण आता अचानक सिनेमाचं रिलीज लांबणीवर पडणार असं बोललं जात आहे.अशामध्ये सिनेमा आता 2024 लाच प्रेक्षकांच्या भेटीला येईल
पुष्पा सिनेमात अल्लू अर्जुन,रश्मिका मंदाना आणि फहाद फसील मुख्य भूमिका साकारल्या होत्या. तसंच समंथानं ‘ओ अंटावा’ हे आयटम नंबर केलं होतं जे तुफान गाजलं होतं. या सिनेमाला सुकुमारनं दिग्दर्शित केलं होतं.
सिनेमाचा पहिला भाग हिट झाला त्यामुळे आता सीक्वेलवर देखील टीम जोरदार मेहनत घेताना दिसत आहे आणि कोणतीच कसर त्यांना यावेळी सोडायची नाहीय. तसंच,आधीच्या सिनेमापेक्षा सीक्वेल खूप भव्य-दिव्य असेल असं बोललं जात आहे.
बॉलीवूड लाईफच्या रिपोर्टनुसार,सिनेमाचं शूटिंग काही महिने आधीच सुरू झालं होतं पण मेकर्सनी सिनेमाचा छोटासा भागच शूट केला आहे. त्यानंतर शूटिंग झालंच नाही आणि त्याविषयी काही अपडेटही आलेलं नाही की पुन्हा शूट कधी सुरू होणार.
सुकुमार सध्या पुष्पा 2 च्या टीजरमध्ये व्यस्त आहेत,जो अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी रिलीज केला जाईल. रिपोर्टमध्ये सूत्रांनी सांगितल्यानुसार सुकुमार सिनेमाच्या कथेविषयी समाधानी नाही. त्या शूट केलेल्या सिनेमातील काही भाग त्याला पुन्हा शूट करायचा आहे.
आणि जर असं झालं तर ‘पुष्पा 2’ च्या टीमजवळ सिनेमाच्या शूटपासून तो रिलीज करेपर्यंत फार वेळ हातात राहणार नाही. याचा अर्थ असाच होतो की रिलीजसाठी आता आणखी थोडी वाट पहावी लागणार. कदाचित सिनेमा पुढील वर्षी रिलीज केला जाऊ शकतो. यादरम्यान ‘पुष्पा 2’ मधील कलाकार इतर प्रोजेक्टमध्ये बिझी होतील.