कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीशांचा महत्त्वपूर्ण निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ एप्रिल । तीन वर्षांपूर्वी संपूर्ण देशाला वेठीला धरणाऱ्या कोरोनाने आता पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी वकिलांना ऑनलाईन तत्वावर न्यायालयात हजर राहण्याची मुभा असल्याचं म्हटलं आहे. तसंच, प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारे म्हणजेच हायब्रीड पद्धतीनेही कामकाज करता येईल असं सरन्यायाधीश म्हणाले आहेत.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत वृत्त प्रसारित होत आहेत. त्यामुळे वकील हायब्रीड पद्धतीचा अवलंब करून सुनावणीवेळी हजर राहू शकतात. जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हजर राहायचं असेल तर तो पर्यायही वापरू शकता, असं सरन्यायाधीश म्हणाले आहेत.

सर्वोच्च न्यायालय बऱ्याच कालावधीपासून हायब्रीड तत्वावर काम करत आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर जेव्हा सर्वोच्च न्यायालय प्रत्यक्ष सुनावणी तत्वावर सुरू झालं तेव्हा देखील अॅप्लिकेशन आणि यूट्युबच्या माध्यमातून त्याचं कामकाज लाईव्ह सुरू ठेवण्यात आलं होतं. आता गेल्या 24 तासांत 4435 नवीन रुग्ण सापडल्याने देशात सध्या एकूण 23 हजार 91 इतकी कोरोना रुग्णसंख्या झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय सरन्यायाधीशांनी घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *