पुण्यात बगाड यात्रेत सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला ; दोन्ही बाजूचे वीर उंचावरून खाली पडले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ६ एप्रिल । जुन्नर तालुक्यातील पारुंडे येथील ब्रम्हनाथ यात्रेत गाडी-बगाडाला यात्रा आयोजित केली होती. यात्रेचा उत्साह सुरु असताना अपघात झाला आहे. यामुळे सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. या अपघाताचा थरार कॅमेरात कैद झाला आहे.

जुन्नर तालुक्यातील पारुंडे येथील ब्रम्हनाथ यात्रेत गाडी-बगाडाला यात्रा सुरु होती. यावेळी भीषण अपघात झाला आहे. या अपघाताच थरार कॅमेरात कैद झाला. बगाड म्हणजे एका खांबाच्या उंच टोकावर लोखंडी आकड्याने लटकावून माणसाची मिरवणूक काढली जाते. ज्याला नवस फेडायचा आहे त्यांने, किंवा त्याच्या वतीने दुसरा कुणीतरी बगाडस्वार होऊ शकतो. नेहमीप्रमाणे पारुंडेत हा कार्यक्रम सुरु होता.

बगाड यात्रा सुरु असताना बगाड मधोमध तुटला. या दुर्घटनेत दोन्ही बाजूचे वीर उंचावरून जमीनीवर पडून जखमी झाले आहेत. बगाडस्वार खाली पडल्यानंतर सर्वांची धावपळ उडली. ग्रामस्थांनी लागलीच धाव घेत त्यांना रुग्णालयात नेले. या घटनेत एक जण गंभीर जखमी तर दुसरा किरकोळ जखमी आहे.

सुनील चिलप आणि संदीप चिलप बगाड हे दोघे या बगाडाला लटकलेले होते. त्या दरम्यान मिरवणूक पारुंडे येथील चौकात आल्यावर बगाड मध्यभागी तुटले आणि दोघेही जमिनीवर उंचावरून जोरदार आपटले. यामुळे बघणाऱ्यांची एकच गर्दी झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *