Gold-Silver Price on 7 April 2023: विक्रमी उच्चांकानंतर सोने-चांदीचे भाव घसरले, पाहा ताजा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ एप्रिल । Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६०,९८० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६१,३६० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ७६,४९० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७७,०९० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,९०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,९८० रुपये असेल. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५५,९०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६०,९८० प्रति १० ग्रॅम आहे. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,९०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,९८० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,९३० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६१,०१० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ७६४.९० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *